सासू आणि पतीकडून तरुणीला भररस्त्यात बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

0
853

 

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भररस्त्यात सूनेला सासूने काठीने मारहाण केली. त्यानंतर पतीने देखील पत्नीला बेदम मारहाण केली. आपल्या मुलासमोरचं आईला मारहाण करत असल्याचे चित्र दिसत आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नोएडाच्या सेक्टर १३१ मध्ये घडली. महिलेला दोन जण अत्याचार करत आहे. कौटुंबिक वाद झाल्यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर वेळ साधत सासूने देखील सूनेला भररस्त्यात मारहाण केली. शेजारच्यांनी पीडितेला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. स्थानिकांनी फक्त बघ्याची भुमिका केली. पीडित महिलेला सासू काठीने मारहाण करत आहे तर आणखी एक महिला पीडितेचे केस घेचत आहे.

मारहाणीनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढला. अल्पवयीन मुलाला देखील मारहाण केल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. कौटुंबिक वादातून पीडितेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पहा व्हिडीओ:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here