गरोदरपणात खाताय ‘हे’ चार पदार्थ… आजच व्हा सावधान नाही तर..

0
262

आई होणं प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा टप्पा असतो… घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्यामुळे आई – वडील आणि कुटुंबिय प्रचंड आनंदी असतात. पण आनंदाच्या क्षण होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेणं देखील तितकचं महत्त्वाचं असतं… गरोदरपणात महिलांना स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज असते… गरोदरपणात महिलांना उठण्या – बसण्यापासून खाण्या – पिण्याची काळजी घ्यावी लागते… ऐरवी आपण ड्रिंक, फास्ट फूड खाते… पण गरोदरपणात असे अनेक पदार्थ आहेत जे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी घातक असतात.

गरोदरपणात महिलांच्या शरीराला पोषक तत्वांची जास्त गरज असते, त्यामुळे महिलांच्या आहारात फळे, रंगीबेरंगी भाज्या, सुका मेवा, नट्स आणि बिया यांचा संतुलित प्रमाणात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. तर आज जाणून घेऊ गरोदरपणात महिलांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत…

कॅफिन असलेल्या गोष्टींपासून दूर राहा : गरोदरपणात कॅफिन असलेल्या गोष्टींपासून महिलांनी दूर राहावं. कॅफिन असलेले पदार्थ असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे नुकसान होऊ शकतं.. महिलांनी या टप्प्यात चहा-कॉफीचे सेवन कमी करावे. याशिवाय चुकूनही दारू किंवा धुम्रपान करू नये.

तळलेले आणि मसालेदार पदार्थ : गर्भधारणेदरम्यान, महिलांनी तळलेले, मसालेदार आणि फास्ट फूड खाणं टाळावं, कारण या काळात त्यांना बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते.

गरोदरपणात पपई खाऊ शकतो? गरोदरपणात पपई खाऊ नये असं कुटुंबातील वरिष्ठ महिलांचं म्हणणं तुम्ही अनेकदा ऐकले असेल. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नुपूर गुप्ता सांगतात की, गरोदरपणात महिला पपई खाऊ शकतात, मात्र या काळात कच्ची पपई खाऊ नये, कारण त्यात लेटेक्स असते. गर्भधारणेचा धोका वाढतो. म्हणून गरोदरपणात कच्ची पपई खाणं टाळा…

कच्चे अंडे : महिलांनी गरोदरपणात कच्चे अंडे खाणं टाळावं. कारण त्यात साल्मोनेला बॅक्टेरिया आढळतो. ज्यामुळे उलट्या, पोटदुखी आणि जुलाब होऊ शकतात. यासोबतच गर्भातील बाळालाही इजा होऊ शकते. म्हणून गरोदरपणात कच्चे अंडे महिलांनी खाऊ नये…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here