
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : फक्त तीनच महिने झाले तरी विरोधकांच्या डोळ्यात व डोक्यात भाजपाचा नगराध्यक्ष आहे याची सल बोचत आहे त्यामुळेच वारंवार नगरपंचायतला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे परंतु वारंवार हाच उद्योग सुरू ठेवला तर अब्बू नुकसानीचा दावा दाखल करू असे प्रतिपादन नगराध्यक्ष यु. टी जाधव यांनी केले व प्रशासन काळात तुमच्या सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शनने केलेल्या ७ कोटी कामांचा हिशोब तुम्हाला आटपाडी करांच्या समोर मांडावाच लागेल असा इशारा अनिल पाटील यांना दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावे कोट्यावधींचा निधी आणला त्यातूनच तुमचा राजकीय उदय झाला पण त्यांच्याच निधीतील केलेल्या कामांचाआटपाडी शहरात साधे बोर्ड सुद्धा लावण्यास लाज कशाची वाटली? किमान खाललेल्या मिठाला तरी जागा आणि मग आमच्यावर आरोप करा आम्हाला अनिल पाटील झेपणार नाही असे म्हणता अरे मी एकाच तालमीत, कसलेल्या वस्तादाचा पट्टा आहे. दर दोन-तीन वर्षांनी पट्टा बदलणारा नाही याचेही आपण भान ठेवावे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातून जनसेवा करण्यासाठी १ लाख पगाराची नोकरी समर्पित करून प्रामाणिक सेवा करण्यासाठी आलोय याच विषयाची राज्यभर वादळी चर्चा झाली. माझ्या गाडीत कोणाला पाहिजे तेव्हा पत्र व सही शिक्का मिळत असतो. ही गती बघून अनेकांचा पोटसूळ उठला आहे.
त्यामुळेच बेजबाबदार आणि बेताल आरोप सुरू आहेत. ज्या कॉटन मिलचा ४ वर्षे झाले वजन काटा बंद आहे म्हणता तुमच्यासमोर २०२२, २०२३, २०२४, २०२५ ची बिले सादर करतो जर तुमच्यात हिंमत आणि धमक असेल तर पोलखोल करा, अन्यथा राजसंन्यास घ्या ज्या बँकेने तुम्हाला वाचवण्यासाठी जुजबी पत्र दिले वजन काटा आमच्या ताब्यात नाही त्याही बँकेला माझा सवाल आहे मग ही बिले कुठली ? काटा तुमच्या ताब्यात आहे म्हणता मग बिले बाहेर जातातच कशी याचा अर्थ मोरीला बोळा दरवाजा मोकळा अशीच आहे का? त्यामुळे डीसीसी बँकेने जे पत्र दिलं आहे त्यावरून त्यांचे कारभारावर प्रश्नचिन्ह सामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना निर्माण होत आहे. बँकेनेसुद्धा दिशाभूल करू नये.
जिल्हाधिकाऱ्यांकडे या पत्राची ही दाद मागूच मी परवा काचेच्या घरात राहणारांनी दगड मारू नयेत असे म्हणालो त्यांनी मला वैयक्तिक बदनाम करण्याचा डाव आखला. पण प्रशासन काळात तुम्हीच केलेली कोट्यावधीची कामे, रस्त्यात, मुरुमात, गटारात, कोट्यावधीचा निधी कोणी हडपला? अजून एकेकाळी तुमच्याच जिवाभावाच्या असणाऱ्या अनेकांची फसवणूक, पिंपरीतील बोगस भूखंड प्रकरण, आंबेबन मळ्यातील माझ्याच समाज बांधवांची गोड बोलून केलेली घोर फसवणूक, घर बांधून देतो म्हणाला खोट्या सह्या घेतल्या आणि वाऱ्यावर सोडले.
अशी गावभर फसवणूकीची चर्चा असणारी प्रकरणे शिवाय वेगवेगळे कांड केलेली प्रकरणे योग्य वेळी बाहेर निघतीलच. दुसऱ्याकडे एक बोट करताना आपल्याकडे चार बोटे होतात याचे भान ठेवून बोलावे . आटपाडीत भाजपाचा नगराध्यक्ष बसला, माझ्यासारख्या सामान्य कामसू माणसाला जनतेनं निवडून दिलंय शहराचा विकास व उंची वाढविण्यासाठी त्यामुळे अशा अतृप्त आत्म्यांना याचं शल्य आणि दुःख व प्रचंड अहंकार यांना गप्प बसू देत नाही. म्हणूनच टीवटीव सुरू आहे. आम्ही निधी आणण्यासाठी गावाच्या विकासासाठी नगरसेवक व सामान्य नागरिकांना सोबत घेऊन काम करूच, शिवाय विरोधासाठी विरोध करणाऱ्यांचा कामातून समाचार घेऊ असा सूचक इशारा देखील दिला.


