Video : “मला लग्न करायचं” ढसा ढसा रडत चिमुकल्याचा एकच कल्ला! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “”इथं आमचं लग्न होई ना तू जरा..”

0
370

Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरुवात करतात. एका विशिष्ट वयात घरात मुला मुलीच्या लग्नाविषयी चर्चा होते. काही लोक आपल्या पसंतीने म्हणजेच आवडीने लग्न करतात ज्याला आपण लव्ह मॅरेज म्हणतो तर काही लोक घरच्यांच्या पसंतीने लग्न करतात म्हणजेच अरेंज मॅरेज करतात. हल्ली तरुण वयोगटात लव्ह मॅरेजचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक जण अगदी कमी वयात घरच्यांच्या विरोधात लग्न करतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण सध्या एका चिमुकल्याच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा चिमुकला लग्न करायचं, असं सांगत वडिलांजवळ रडताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला वडिलांजवळ रडताना दिसत आहे. तो ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. त्याला रडताना पाहून वडील विचारतात, “हे काय रे काय झालं” त्यावर चिमुकला म्हणतो, “मला लग्न करायंच.”

वडील – काय करायचं तुला

चिमुकला – लग्न .. लग्न

चिमुकला आणखी जोरजोराने रडतो

चिमुकला – तिला सांगा ना करायला. तिला सांगा ना ती फोन करून नाही राहिली.
तो आणखी ढसा ढसा रडताना दिसतो.

चिमुकला – खोटा खोटा फोन केला होता ना

वडील -खरा खरा केला होता

तो आणखी जोरजोराने ओरडू ओरडू रडतो

वडील – तुला काय करायचं

चिमुकला – लग्न करायला सांगा तिला

वडील – लग्न करायचं?

चिमुकला – हो

 

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लग्न करायचं?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा मोठा झाला की स्वत:च हसेल. एन्जॉय करेल व्हिडीओ. माझ्या बकेट लिस्टमध्ये पहिली इच्छा लग्न होते म्हणून” तर एका युजरने लिहिलेय, “आताच लहान आहे तर रडून लग्न करून घे नाही तर मोठा झाला की रडला तरी लग्नाला मुलगी नाही भेटणार …. खूप मुलं रडतात बघ की ..” आणखी एका युजरने लिहिलेय, “इथ आमचं लग्न होई ना तू जरा शांत बस बर का” अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here