हार्दिक पांड्या करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट? कोण आहे हे हि अभिनेत्री?

0
401

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.सोशल मीडियावर पोस्ट करत 18 जुलै रोजी हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता हार्दिक पांड्या एका ब्रिटीश गायिकेला डेट करत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हार्दिक आणि जास्मिन दोघेही ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवत असल्याचंही सांगण्यात येत आहे.

हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया एकाच ठिकाणी आणि एकाच पूलमध्ये असल्याचं दिसतंय. हार्दिक पांड्याने एक फोटो पोस्ट केला होता.हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या पोस्टमधील आजूबाजूचे दृश्य आणि जास्मिनने पोस्ट केलेल्या फोटोतील दृश्य एकच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दोघंही एकाच ठिकाणी गेल्याचा दावा करण्यात येत आहे.जास्मिनचे अलीकडील सर्व फोटो लाईक केले आहेत. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात, यामुळे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

कोण आहे जास्मिन वालिया?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे, जिची चर्चा म्युझिक इंडस्ट्रीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र होते.जास्मिननने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केले आणि 2018 मध्ये ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या बॉलिवूड चित्रपटासाठी ‘बम डिगी डिगी बम’ या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली.जास्मिन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून, इन्स्टाग्रामवर तिचे 6.4 लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर जास्मिनला 5.7 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे.हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here