बनावट ईमेल आयडीचा वापर करून राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक,दोघांना अटक

0
127

 

आरोपींनी नागपूर सायबर पोलिस(Nagpur Police) असल्याचे भासवून विविध बँकांना फसवणूक करणारे ईमेल पाठवले होते. या प्रकरणात आयसीआयसीआय बँक नागपूर येथील असिस्टंट बँक मॅनेजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, पाणीग्राही यांना त्यांच्या बँक खात्याच्या फ्रिज आणि डीफ्रिज करण्याबाबत सायबर पोलिस असल्याचे सांगण्यात आले होते. ईमेलची पडताळणी केल्यानंतर तो बनावट असल्याचे उघड झाले.

सायबर पोलिसांनी तपासादरम्यान बनावट ईमेल आयडीचा तपास करून मुंबईतील दोन आरोपींची ओळख पटवली. प्रदुम सिंह आणि शुभम साहू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींनी नागपूर सायबर पोलिस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली होती. ते बनावट ईमेल आयडीचा वापर करून बँक खात्यांचे फ्रिज आणि अनफ्रिज करण्याची मागणी करत होते.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त निमीत गोयल, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित डोळस आणि त्यांच्या टीमने केला. आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.