लातूरच्या कान्हारी चौकात सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका जेसीबी चालकाने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या 10 ते 12 जणांना उडवलं त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण भाजी आणण्यासाठी मंडईत गेला होता. वेगाने येणाऱ्या जेसीबीच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर जेसीबी चालकाने पळून जायचा प्रयत्न केला मात्र अनेक दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
आरोपी जेसीबी चालकाचे त्याच्या मित्राशी भांडण झाले होते. नंतर त्याने मद्यपान केले. आणि दारूच्या नशेत काहींना उडवलं. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून आरोपी जेसीबी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.