
शालेय जीवन म्हणजे सुंदर आठवणीचा खजिना असतो. शाळेमध्ये अभ्यासाबरोबर मौज-मस्ती करण्याची देखील वेगळीच मज्जा असते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणते ना कोणते कौशल्य असते कोणी सुंदर चित्र काढते, कोणी सुंदर डान्स करते तर कोणी सुंदर गायन करते. मुलांमध्ये असलेल्या या कौशल्याला शालेय जीवनामध्येच प्रोत्साहन दिले आणि योग्य मार्गदर्शन केले तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो. सध्या अशाच एका शाळेतील मुलांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डान्स शिक्षक सर्व मुलांना डान्स शिकवत आहे. सर्व विद्यार्थी आपल्या पद्धतीने डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे पण सर्वांमध्ये एक चिमुकला आहे जो अफलातून डान्स करत आहे. चिमुकल्याच्या कौशल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये शालेय गणवेश परिधान केलेले काही विद्यार्थी स्टेजवर उभे राहून कि किली किलीये या तेलगु गाण्यावर डान्स करत आहे. सर्वजण जमेल त्या पद्धतीने नाचत आहे. डान्स टीचर मुलांना गाण्यावरील डान्स स्टेप्स करून दाखवत आहे त्याप्रमाणे मुलं डान्स करत आहे. काही मुलांना नीट नाचता येत नसले तरी तो हा क्षणाचा आनंद घेत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. दरम्यान एक चिमुकला गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. त्याला गाण्याच्या सर्व डान्स स्टेप्स लक्षात आहेत तो अचूकपणे त्या करत आहे. एवढंच नाही तर नाचताना तो त्या क्षणाचा आनंद घेत आहे. त्याच्या चेहर्या वरील हाव-भाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.