काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”

0
3692

सोशल मीडियावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो सध्या असाच एका चिमुकल्याचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शाळेच्या गणवेशात हा चिमुकला जबरदस्त लावणी नृत्य सादर करताना दिसत आहे. या चिमुकल्याची लावणी पाहून कोणीही थक्क होईल.

 

हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चिमुकला नृत्य सादर करत आहे. त्याने शाळेचा गणवेश घातला असून तो सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील लोकांसमोर डान्स करताना दिसत आहे. “मला पिरतिच्या झुल्यात झुलवा” या लोकप्रिय मराठी लावणी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या चिमुकल्याची लावणी पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. त्याच्या स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही अवाक् होईल. या चिमुकल्याचा डान्स पाहताना तुमची नजर हटणार नाही. त्याच्या प्रत्येक डान्स स्टेपवर लोक कौतुकाने ओरडताना दिसत आहे.

 

“एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे होऊ दे व्हायरल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सगळ्या लावणी सम्राट फिक्या आहे…! सोप्पं नव्हं माय जिल्हापरिषदच पोरगं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “आपली मराठी शाळा डोक्याला ताण घ्यायचा नाही.”

 

“शेतकऱ्याच्या पोराचा नाद नाय करायचा..” एक युजर लिहितो, “ना कोणता मेकअप , नाही कोणता स्टेज ,फक्त शाळेच्या गणवेशात मस्त कला, अप्रतिम स्टेज कॉन्फिडन्स” तर एक युजर लिहितो, “कला ही गरीब घरातच असते पण परिस्थितीमुळे मागे असते!!” एका युजरने लिहिलेय, “गरीबाचं पोरगं कधी वाया नाही जाणार…डेरींग लागते एवढ्या लोकांसमोर डान्स करायला…” तर एका युजरने लिहिलेय, “मनमुराद आनंद लुटला भावानं” अनेक युजर्सना या चिमुकल्याचा डान्स आवडला.