‘या’ दोन मराठी अभिनेत्री करणार हिंदी वेब सीरिजमध्ये पदार्पण

0
186

मराठी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप सोडणारी आणि ‘महाराष्ट्राची क्रश’ ओळखली जाणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही आता हिंदी वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहे. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या ‘कमांडर करण सक्सेना’ (Commander Karan Saxena) या वेब सीरिजमध्ये हृता दुर्गुळेसोबत आणखी एक मराठी अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करत आहे. टीआरपीमध्ये आघाडीवर असणारी ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) हिंदी वेब सीरिज मध्ये झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने निरोप घेतला होता.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका चांगलीच लोकप्रिय होती. या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकरने अप्पू ही व्यक्तीरेखा साकारली होती. मालिकेतील अप्पू आणि शंशाक या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले होते. आता ज्ञानदा रामतीर्थकर ही ‘कमांडर करण सक्सेना’मध्ये भूमिका साकारणार आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ज्ञानदा रामतीर्थकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘कमांडर करण सक्सेना’ या वेब सीरिजमध्ये मी मिली ही व्यक्तीरेखा साकारत आहे. माझी ही पहिली हिंदी वेब सीरिज असल्याचे तिने सांगितले. या हिंदी वेब सीरिजमधील संधीसाठी ज्ञानदाने दिग्दर्शक जतीन वागळे यांचे आभार मानले आहे.

गुरमीत चौधरी हा या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 8 जुलैपासून ही वेब सीरिज ‘डिस्ने हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/reel/C89yRG5JnEO/?utm_source=ig_web_copy_link

हृता झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत
या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे ही तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या भूमिकेतला एक फोटो पोस्ट केला होता.

https://www.instagram.com/p/C84Z7YaN8Kh/?utm_source=ig_web_copy_link

‘फुलपाखरू’ मालिकेमुळे हृता दुर्गुळे ही घराघरात पोहचली. तर, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. ‘अनन्या’, ‘टाईमपास 3’, ‘कन्नी’, ‘सर्किट’ या चित्रपटातून ती झळकली. मराठी छोटा पडदा आणि वेब सीरिजमध्ये कमाल दाखवल्यानंतर हृता आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. हृता आता ‘कमांडर करण सक्सेना’ या वेबसीरिज मधून ओटीटी विश्वात आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीमध्ये झळकणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here