अन ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’ पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल

0
27

सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच मनोरंज व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमधील व्यक्ती ही दारुडी आहे. जी देशी दारु पिऊन काय करतेय हे तिलाच कळत नाही.

दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना विचित्र प्रकार करताना पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. इथपर्यंत सगळं ठिक आहे. पण एका व्यक्तीनं असा प्रकार केला, ज्यामुळे तेलंगणा पोलिसही अवाक् झाले आहेत. राज्यातील हनमकोंडा येथे पोलिसांसोबत एक विचित्र घटना घडली आहे. येथे एका तलावात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुमारे ८ तास तो तलावाच्या काठावर पडून होता, यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेहाला हाताला पकडून बाहेर काढणार तेवढ्यात त्यानं हात झटकला अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तलावाजवळ लोकांची गर्दी दिसत आहे. पोलीस येताच सर्वांनी त्यांना तलावात पडलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवलं. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली आणि मग मृतदेहाजवळ पोहोचले. पोलिसांनी तलावात पडलेल्या व्यक्तीचा हात पकडला. तेवढ्यात व्यक्तीने हालचाल केली अन् तो चक्क उठून बसला, मग पोलिसांच्या हातातील हात सोडवून उठून उभा राहिला. हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलीस आणि गर्दी पाहून ती व्यक्तीही घाबरली. सुमारे ८ तास प्रेताप्रमाणे बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची प्रकृती उत्तम असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

पाहा व्हिडीओ:

instagram.com/reel/C8CeSBcgTH7

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here