ताज्या बातम्यामनोरंजन

‘या’ लोकप्रिय अभिनेत्याच्या आईचे निधन

 

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अमित खेडेकर सध्या चर्चेत आहे. अमित खेडेकरच्या आईचे निधन झाले आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. अमितच्या आईने 15 मे 2024 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या आईची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आहे. अमितच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहते कमेंट्स करत शोक व्यक्त करत आहेत.

अमित खेडेकरने पोस्ट शेअर करत दिली आईच्या निधनाची बातमी
अभिनेता अमित खेडेकरने पोस्ट शेअर करत चाहत्यांना आईच्या निधनाची बातमी दिली आहे. अमितने लिहिलं आहे,”हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की माझी आई, सौ. सुनिता खेडेकर 15 मे रोजी रात्री 12.50 च्या सुमारास वयाच्या 60 व्या वर्षी या जगातून कायमची निघून गेली आहे. ती गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती”.

अमितने पुढे लिहिलं आहे,”ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वस्व होती. तिच्या निधनाने माझे पूर्ण कुटुंबीय दु:खाच्या छायेत आहेत. तिच्या जवळच्या लोकांना पलीकडेही माझ्या आईचा प्रेमळ प्रभाव आमच्या व्यापक, समुदायावर पसरला आहे. ती नेहमी गरजूंना खांदा देण्यासाठी तयार असायची. तिच्या दयाळूपणाच्या आणि उदारतेच्या नि:स्वार्थ कृत्यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि तिच्याबरोबर संपर्कात आलेल्या सर्वांवर एक छाप सोडली. खरंतर तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही. या कठीण काळात आमच्या सोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना”.

अमित खेडेकर आणि रश्मी अनपट या दोन्ही कलाकारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रश्मी अनपट लवकरच कलर्स मराठीवरील अंतरपाट या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर अमित खेडेकर याने काही दिवसांपूर्वीच कन्यादान मालिकेला निरोप दिलेला पाहायला मिळाला होता. मराठी मनोरंजनसृष्टीत दोघांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. रश्मी अनपटने अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत तर अमितने देखील चित्रपट मालिकेतून सहाय्यक भूमिका निभावल्या आहेत. आता दोघांच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button