विशाल पाटीलसह महाविकास आघाडी च्या खासदारांच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकार विरोधात घोषणा!

0
395

आज मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार, उत्तराखंड या राज्यांसाठी विशेष घोषणा झाल्या मात्र महाराष्ट्रासाठी कोणतीच विशेष योजना जाहीर न झाल्याने महाविकास आघाडी च्या खासदारांच्या मोदी सरकार विरोधात संसदेच्या परिसरात घोषणा दिल्या. ‘ मोदी सरकार हाय हाय’ म्हणत त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी तर अपक्ष निवडून आलेले विशाल पाटील देखील निषेध नोंदवताना दिसले आहेत. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद आज अर्थसंकल्पात जाहीर झाली आहे.
पहा मविआ खासदारांचा निषेध

विशाल पाटीलसह

पहा व्हिडीओ:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here