
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : येथील डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक येथे बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्या समोर माता रमाई यांची जयंती दिनांक ०७ रोजी रात्री १२.०० वाजता साजरा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक व महिला उपस्थित होत्या.
आटपाडी शहरातील डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक येथे बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळा भीमसैनिकांनी बसविला आहे. या ठिकाणी सर्व भीमसैनिक व महिला यांनी रात्री १२.०० वाजता एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची जयंती साजरी केली. याप्रसंगी सामुदायिक त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. माता रमाई या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत्या. त्यांचा त्याग आणि संघर्ष आंबेडकरी चळवळीतील सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.