
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी अवैध वाळू तस्करी विरुद्ध धडक मोहीम राबविली असून, दिघंची, निंबवडे येथे कारवाई करत एक ट्रॅक्टर व पिकअप टेम्पो जप्त करण्यात आला असून,वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत वाळू माफियांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदारसागर ढवळे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअप व कारवाई करत वाहने जप्त केली आहेत.
या पथकामध्ये ग्राम महसूल अधिकारी विनायक बालटे, शेषराव मुंडे, विनायक पाटील, नितीन नाईक, महसूल सेवक गोरख जावीर यांनी रात्री गस्त घालून एक ट्रक्टर व एक पिक अप टॅम्पो पकडून दोन्ही वाहने पोलीस स्टेशन च्या आवारात लावण्यात आली आहेत.
दिघंची येथे दिनांक गुरुवारी रात्री १ ते पहाटे ३ वाजेपर्यंत तहसिलदार स्वतः पथकासोबत होते. या वाहन व चालकांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नुसार दंडनीय कारवाई ची नोटीस देणेत आली आहे.आटपाडी तहसिलदार सागर ढवळे रजेवरून हजर झाल्यापासून वाळू तस्करावर सलग दुसरी कारवाई आहे. त्यामुळे वाळू चोरी व अवैध वाहतूकीवर कारवाई होत असलेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आटपाडीतालुक्यामध्ये वाळू माफियांनी अवैध वाळू चोरी व उत्खनन बाबत गेल्या दोन महिन्यापासून उच्छाद मांडला होता. तहसीलदार सागर ढवळे हे गेले दोन महिने रजेवर असताना वाळू तस्करीचा आलेख वाढला होता. दरम्यान तहसीलदार सागर ढवळे हे हजर झालेनंतर दोनच दिवसात दोन कारवाया करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
निंबवडे येथे तहसिलदार सागर ढवळे हे स्वतः ग्राम महसूल अधिकारी विनायक बालटे यांच्या समवेत ट्रॅक्टर वर बसून कारवाईत सहभागी झाले होते. पथकामध्ये फक्त दोघेच असताना हि कारवाई करण्यात आली. तसेच दिघंची येथील कारवाईत तहसिलदार स्वतः पथकासोबत होते.