
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात ब्राम्हणगल्लीतील श्री दत्त मंदिरात रविवारी श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार असल्याची माहिती श्री गोंदवलेकर महाराज आरती मंडळ, दत्तमंदिर, श्रीराम मंदिर, श्री आईसाहेब देवस्थान ट्रस्टने दिली.
जन्मोत्सवानिमित्त रविवारी पहाटे 5.30 वाजता काकड आरती, 7.30 वाजता श्री सत्यनारायण पूजा व अभिषेक, 9 वाजता जन्मोत्सव आणि पालखी सोहळा, 12 वाजता दुपारती आणि 12.30 ते 3.30 पर्यंत महाप्रसाद कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता आरतीने सोहळ्याची सांगता होणार आहे.
जन्मोत्सव सोहळ्यास सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत श्री चा पालखी सोहळा होणार आहे. राम मंदिर पासून पालखी सोहळा सुरुवात होईल. तेथून घाटापासून ते भाजी मंडई, मुख्य व्यापारी पेठ, पोस्ट ऑफिस मार्गे मंदिराजवळील ही पालखी येईल.