
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : घरनिकीत येथे पती-पत्नीला मारहाण झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, यातील आरोपी मोहन मल्हारी तोरणे, रावसाहेब मोहन तोरणे, मारुती मोहन तोरणे, सुरेश दादासो तोरणे, दादासो नामदेव तोरणे, सुलाबाई दादासो तोरणे, वनिता दादासो तोरणे, शकुंतला शिवाजी केंगार, रुक्मिणी शामराव केंगार सर्व रा.घरनिकी ता. आटपाडी जि. सांगली या आरोपींनी फिर्यादी यांचे पती प्रताप लालासो तोरणे हे गावात गेले असताना तेथे मोहन मल्हारी तोरणे यास आमचे मोकळे जागेत घाण करू नका असे म्हणाले असता आरोपींनी फिर्यादी यांचे पती यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती हे गाव देवाचा कार्यक्रम बघून घरी चालत बोलत जात असताना पुन्हा आरोपींनी काठीने व कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादीचे पती च्या डोक्यात,पाठीवर,मानेवर मारहाण करून जखमी केले. तसेच आरोपींनी लाथाबुक्क्यांनी फिर्यादीस व फिर्यादीचे पती यांना मारहाण केली. सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.