
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील घाणंदमध्ये एकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
यातील फिर्यादी हणमंत आबा पाटील (वय 55) रा.घाणंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यातील आरोपी प्रकाश श्रीरंग देशमुख, विशाल प्रकाश देशमुख, अनिता प्रकाश देशमुख सर्व रा. घाणंद या आरोपींनी फिर्यादीला जनावरांच्या वैरणीच्या सारा दीड हजारला विकत घेण्याचे कारणावरून व्यवहार झाल्याने, त्यानंतर त्याने साऱ्याचे पैसे देणार बाकीचे पैसे देणार नाही यावरून फिर्यादीस, व्यवहारात बसत नाही तुला पहिल्यांदाच कळाले नाही, या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस छातीवर तोंडावर हाताने मारहाण करून, हातावर काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी आटपाडी पोलिसात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.