‘आजपासून बिग बॉस बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका’, भाऊच्या धक्क्यावर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

0
506

बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. यंदाचा सीझनचा टीआरपीही सर्वाधिक आहे. यंदाच्या सीझन, होस्ट आणि सदस्यांची सर्वत्र चर्चा होत असताना दरम्यान, आता बिग बॉस प्रेमी मात्र नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचा होस्ट आणि शोच्या मेकर्सवर नाराजीचा सूर असल्याचं दिसत आहे. काल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनं इतर सदस्यांची शाळा घेण्याऐवजी निक्कीची शाळा घ्यायला हवी होती, शो निक्कीच्या बाजूने बायस असल्याची प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे.

बिग बॉस मराठीवर प्रेक्षक संतापले
बिग बॉस मराठी शोवर प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे. ‘बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका’, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाऊच्या धक्क्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत, पण कालचा भाऊच्या धक्का सर्वात आतापर्यंतचा वाईट धक्का होता, अशी कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.

रितेश भाऊवर नेटकरी नाराज
“सगळ्यात घाण धक्का आजचा, सॉरी निकीच्या बिग बॉसचा” “Worst भाऊचा धक्का” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना आणि संताप व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे, “मुळात निक्की हिंदी बिग बॉसमध्ये सर्व खेळ बघून अथवा शिकून आली. बाकीचे स्पर्धक नवीन त्यामुळे फक्त निक्की बिग बॉसमध्ये वरचढ दिसते. या बिग बॉस मराठी निक्कीला विजेती घोषित करुन बिग बॉस बंद करा. निक्की नॉमिनेट झाल्यावर वोटिंग लाईन्स बंद करुन प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचं षडयंत्र बंद करा.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, “बॉयकॉट बिग बॉस मराठी. भंगार शो आहे. हा शो फक्त निक्की आणि अभिजितसाठी बनवला आहे. प्रेक्षकांना नाराज आज निराश केलं तुम्ही. आजपासून आम्ही हा शो बघणार नाही. घेऊन आता नाचवत बसा डोक्यावर घेऊन तुमच्या निक्कीला.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, “रितेश भाऊ काय तरी वेगळं करतील ह्या आशेने जनता घरातली सगळी कामे आवरून 9 च्या शोची वाट बघतात अन् हे रितेश भाऊ 9 वाजल्यापासून निकी आणि अरबाजचं लफडं सांगत बसले. येड्यात काढताय का महाराष्ट्राच्या जनतेला?”

पहा पोस्ट:

instagram.com/reel/C_VsTovyq-G

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here