आटपाडी : दुचाकीस धडक दिल्या प्रकरणी ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल

0
6

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : मोटारसायकलीस धडक दिल्या प्रकरणी ट्रक्टर चालकावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना पात्रेवाडी गावामध्ये दिनांक २६/४/२०२४ रोजी घडली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी विमल सुरेश देशमुख (वय ४६) रा. सोनंद ता. सांगोला, जि. सोलापूर ह्या त्यांचा मुलगा आशितोष सूरेश देशमूख याच्या बरोबर दुचाकी गाडीवरून (MH 10EC 8372) म्हसवड जि. सातारा येथे सिध्दनाथ देवदर्शनासाठी जात असताना पात्रेवाडीहून शेटफळे गावात प्रवेश करताना वळणावरती समोरुन रस्त्याच्या मधुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रक्टरने (RJ 09 RA 4526) वरील चालकाने फिर्यादीचे मोटारसायकलीस समोरून धडक दिली. यामध्ये फिर्यादी व त्यांचा मुलगा आशुतोष हे गंभीर जखमी झाले.

याबाबत फिर्यादी विमल सुरेश देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here