आटपाडीतील युवकाचा पोहताना मृत्यू

0
73

माणदेश एक्सप्रेस न्यूज

आटपाडी : भिवघाट रोडलगत कैद्यांची खुली वासहत असणाऱ्या स्वतंत्रपूर जवळ असलेल्या विहिरी मध्ये मित्रांच्या समवेत पोहण्यासाठी गेलेल्या  निशिकांत राजेंद्र जाधव वय 21 रा.कोष्टी गल्ली आटपाडी याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दरम्यान या घटनेने आटपाडी शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निशीकांत हा आपल्या इतर मित्रांच्या समवेत स्वतंत्रपूर कडे जाणाऱ्या रोडलगत असरणाऱ्या राहुल राजमाने यांच्या गट नंबर 2762 मधील विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान याच कालावधी मध्ये अन्य युवकही पोहण्यासाठी आले होते. तर काही युवक पोहणे संपवून विहिरीतून बाहेर पडत होते. याचवेळी निशिकांत  याने पुन्हा एक उडी विहिरीत घेतली तो पुन्हा वर आलाच नाही.

 

मित्रांनी काहीवेळ तो वर येण्याची वाट पाहली व विहिरी मध्ये उड्या घेऊन शोधा शोध केली मात्र तो विहिरीमध्ये अतिशय खोलवर गेला होता. दरम्यान विहिरी मध्ये 50 फुटा पेक्षा जास्त पाणी असल्याने शोध मोहीम राबविण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक युवकांनी पाण्या मध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला व पाणी काढण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यात आले होते. मात्र जवळूनच आटपाडी तलावाच्या पाण्याचा कालवा जात असल्याने विहिरीमधील मधील पाणी उपसने अशक्यप्राय होते.

 

शोध मोहीम असफल झाल्याने अखेर सांगली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते.  आयुष हेल्पलाईन टीम कुपवाड टीम प्रमुख अविनाश पवार, रुद्रप्रताप कारंडे, यश मोहिते, कयूम सनदी, प्रमोद ऐवळे यांच्या माध्यमातून  मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here