ताज्या बातम्याऑटोमोबाईलराष्ट्रीय

आता श्रीलंकामध्येही होणार ‘या’ भारतीय ॲपद्वारे युपीआय पेमेंट; कंपनीने लंका पे च्या मदतीने सुरु केली सेवा

 

डिजिटल जगात भारत सतत प्रगती करत आहे. पैशांचा व्यवहार असो वा इतर पेमेंट, अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठा वाटा युपीआयचा पेमेंट सेवेचा आहे. आता फिनटेक कंपनी फोन पे च्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

श्रीलंकेला जाणारे भारतीय फोन पे ॲपच्या मदतीने सहज युपीआय पेमेंट करू शकतील. यासाठी फोनपे कंपनीने 15 मे रोजी श्रीलंकेच्या लंका पे सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. यामुळे युपीआय आणि लंका पे च्या भागीदारीद्वारे व्यवहार सुलभ होतील. ही सेवा वापरकर्त्यांना रोख रक्कम आणि चलन विनिमयाच्या समस्येपासून मुक्त करेल. तसेच हा व्यवहार जलद आणि सुरक्षित असेल. भारताचा युनिफाइड पेमेंट इंटरफेस आता नेपाळ, भूतान, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांत वापरला जात आहे. ही सेवा तिथल्या भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध असेल

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button