दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखेबाबत मोठी अपडेट ! लवकरच होणार जाहीर

0
4

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा राज्यभरात घेण्यात आल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहताना दिसले.माहितीनुसार दहावी आणि बारावीच्या निकालांचे काम जवळपास पूर्ण झाले असून ,येत्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल तर बारावीचा निकाल मेच्या चौथ्या आठवड्यात लागणार आहे.

बारावीचा निकाल जवळपास २१ किंवा २२मे रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली असून निकालाची तारीख येत्या दोन दिवसात जाहीर होईल,असे बोर्डातील वरिष्ठ अधिकार्र्यांनी सांगितले.दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडल्या. आता दहावीच्या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मोठी माहिती देण्यात आलीये. बोर्डाच्या अध्यक्षांनी दहावीचा निकाल नेमका कधी लागणार याबद्दल माहिती सांगितली आहे. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी आपला दहावीचा निकाल पाहू शकतात. यंदा देखील बोर्डाकडून काॅपीमुख्य परीक्षा घेण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. राज्यात कॉपीमुक्त दहावीची परीक्षा पार पडलीये. भरारी पथकांच्या संख्येत देखील बोर्डाकडून मोठी वाढ करण्यात आली होती.

यंदाच्या निकालात मुले बाजी मारतात की, मुली बाजी मारतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे देखील सांगितले जातंय. 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here