माडगुळेत महिलेला दगड व काठीने मारहाण ; चार आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

0
7

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे महिलेला मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी आटपाडी पोलिसात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी रेश्मा विठ्ठल सावंत, (वय 45), व्यवसाय घरकाम मजुरी रा. माडगूळे दि.30/05/2024 रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास फिर्यादीस फिर्यादीचे पती विठ्ठल हे दारू पिऊन शिवीगाळी करत होते. त्यावेळी फिर्यादीचे दिर नंदकुमार सावंत हे फिर्यादीचे घराच्या समोर येऊन फिर्यादीस वाईट वंगाळ शिविगाळी केली व दिर याने फिर्यादीस तू माझा भाऊ विठ्ठल यास का शिव्या देतेस असे म्हणून लागला व हातात एक कळकाची काठी घेऊन येऊन फिर्यादीस मारहाण केली आहे.

त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी फिर्यादीची मुलगी कोमल ही रात्रपाळी करून घरी आली. त्यावेळी फिर्यादीचे मुलीने फिर्यादीचे जाऊ मीना हिला विचारले की मी नसताना तुझ्या मुलाने व नवऱ्याने माझ्या आईला शिवीगाळी करुन काठीने का मारले असे विचारले असता त्यावेळी फिर्यादीचे मुलीला फिर्यादीची जाऊ मीना हिने पकडून धरले व नंदकुमार यांने दगड डोक्यात मारून जखमी केले अजय व विजय याने फिर्यादीचे मुलीला वाईट वंगाळ शिवीगाळी करून काठीने मारहाण केली आहे त्यावेळी जाऊ मीना हिने फिर्यादी व फिर्यादीची मुलगी हिला शिवीगाळी केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फिर्यादी रेश्मा विठ्ठल सावंत यांच्या फिर्यादी वरून आरोपी १ नंदकुमार भगवान सावंत, २ विजय नंदकुमार सावंत, 3, सौ. मीना नंदकुमार सावंत 4 अजय अजय नंदकुमार सावंत सर्व रा. माडगूळे, ता. आटपाडी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here