आटपाडीगुन्हेताज्या बातम्या

करगणी-रामनगरमध्ये रिटायर्ड पोलिसास डमडमने उडविले ; पोलीस गंभीर जखमी

सदर घटनेची नोंद आटपाडी पोलिसात झाली असून, पोलीसावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी-रामनगर येथे घराच्या बाहेर उभा असलेल्या सेवानिवृत्त पोलीसास डमडमने उडविले असून यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेची नोंद आटपाडी पोलिसात झाली असून, पोलीसावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी हणमंत जगन्नाथ धनवडे (वय ६६) हे रिटायर्ड पोलिस आहेत. दिनांक 29/05/2024 रोजी सकाळी 05.00 वाजता ते त्यांचे घरासमोरील रोडवरून येत असताना भिवघाटकडून आटपाडीकडे जाणारा छोटा हत्ती टेम्पो वरील चालकाने फिर्यादीस धडक दिली.

या धडकेमध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील उषःकाल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. हणमंत धनवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात डमडम चालकाविरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button