VIdeo : मुस्लिम महिलांचा बुरखा काढला ; भाजपच्या महिला उमेदवाराच्या अडचणीत वाढ : व्हिडिओ व्हायरल

0
2

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांना जोरदार टक्कर देणाऱ्या भाजपच्या उमेदवार के. माधवी लता यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. ऐन मतदानादिवशी सोमवारी (ता. 13) त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी काही मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपासणी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

 

देशात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यात देशभर चर्चेत असलेल्या माधवी लता यांच्या समावेश आहे. त्यांचा हैदराबादचे चार वेळा खासदार राहिलेले आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी सामना होत आहे. काही वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने माधवी लता यांचे नाव देशभर गाजले. यानंतरही ऐन मतदानादिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माधवी लता या मतदान केंद्रावर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांना त्यांचे चेहरे दाखवण्यास सांगत आहे. चेहरा पाहून त्या मतदार ओळखपत्रावरील छायाचित्रांशी तो जुळवून पाहत होत्या. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत असून माधवी लतांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. हा व्हिडिओ ओवेसींनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला असला तरी त्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

आपल्या कृतीचे माधवी लता यांनी समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले, मी लोकसभेची उमेदवार असून मला कायद्यानुसार मतदार ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. तसेच मी पुरुष नाही, मी एक स्त्री आहे. त्यांनी मी अत्यंत नम्रतेने चेहरे आणि ओखळपत्र तपासण्याबाबत विनंती केली होती. आता यावर कोणाला मोठा विरोध करायचा असेल तर त्याकडे मी लक्ष देत नाही. या विरोधातून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसून येते, असा टोलाही माधवी लता यांनी लगावला.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here