क्रीडा

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ! “हा” खेळाडू दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही

राजस्थानला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी पंजाब किंग्ज आणि केकेआरविरुद्ध खेजिंकणे महत्त्वाचे आहे

राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर फलंदाज जोस बटलर मायदेशी परतला आहे. आता तो आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण हे दोन्ही सामने संघाला प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जे त्यांना पंजाब किंग्ज आणि केकेआरविरुद्ध खेळायचे आहेत.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वी इंग्लंड संघाला पाकिस्तानविरुद्ध चार टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ मे रोजी होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जोस बटलर इंग्लंडचा कर्णधार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी होण्यासाठी तो इंग्लंडला परतला आहे. टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने पाकिस्तान आणि इंग्लंडसाठी टी-२० मालिका खूप महत्त्वाची आहे.

 

आयपीएल २०२४ मध्ये जोस बटलरची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये ३५९ धावा केल्या आहेत. ज्यात २ शतकांचा समावेश आहे. त्याने संघासाठी अनेक चमकदार खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची उपस्थिती राजस्थान रॉयल्सला बळ देत होती. राजस्थान रॉयल्स संघाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, “मिस यू जोस भाई.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button