
इंग्लंडची क्रिकेटपटू एमी जोन्स हिने ऑस्ट्रेलियाची क्रिकेटर पिपा क्लीरी सोबत इंगेजमेंट केल्याची घोषणा केली आहे. एमी जोन्सने इंस्टाग्रामवर क्लीरीसोबतचा फोटो पोस्टकरून चियर्स टू एव्हर असे कॅप्शन लिहिले आहे. एंगेजमेंटच्या फोटोत क्लीरीच्या बोटात हिऱ्याची अंगठी दिसतेय. या दोघी बऱ्याच काळापासून डेटिंग करत होत्या. एमी जोन्स इंग्लंडची यष्टीरक्षक आहे. तर, पिपा क्लीरी ऑस्ट्रेलियाची गोलंदाज आहे. महिला बिग बॅग लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सकडून खेळत असताना दोघींची भेट झाली होती.