राजकारणात काहीही होवू शकते ; राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ‘या’ नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ….

0
1

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, खासदार प्रफुल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न खासदार प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना प्रफुल पटेल यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक भाष्य केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

“मला शरद पवार यांच्याबाबत आयुष्यभर सन्मान राहील. मी कधीही शरद पवार यांना भेटेल. मला शरद पवार यांना भेटण्यात काहीही अडचण नाही. मागच्यावेळी नेहरू सेंटरला विश्वस्थांची बैठक होती. मी विश्वस्थ होतो. त्यामुळे मी तेथे गेलो होतो. एखाद्या संस्थेच्या कामासाठी किंवा मला शरद पवार कुठे दिसले आणि त्यांचे लक्ष नसले तरी मी त्यांच्याकडे जाईल आणि त्यांची विचारपूस करेल”, असं ते शरद पवार यांच्याबाबत बोलताना म्हणाले.

 

राष्ट्रवादी सत्तेत येण्याचे प्रयत्न चारवेळा फसले. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न विचारला असता यावर प्रफुल पटेल म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकतं. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं वाटलं होतं का? त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाला नेतृत्व मिळावं किंवा आमच्या नेत्याला मुख्यमंत्री करावं, यासाठी आणचा प्रयत्न का राहणार नाही? मात्र, प्रत्येक गोष्टीला आपल्याला रिअॅयलिटीशी जोडूनच प्रयत्न करावे लागतात. इच्छा प्रत्येकाची असते. शरद पवार यांचीही पंतप्रधान होण्याची इच्छा होती, पण ते नाही झाले. जेव्हा संधी आली होती, तेव्हा त्यांनी ती गमवली”, असंही प्रफुल पटेल म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here