मोबाईल चार्ज करताना शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

0
1

राजस्थानमधील बारां जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोन सख्ख्या भावांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोबाईल चार्ज करताना हा अपघात घडला. यावेळी एक महिलाही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी शाहबाद उपविभागातील कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील शहााबाद उपविभागातील कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरगुती लाईनमध्ये 11 केव्हीचा विद्युत प्रवाह पसरल्याने घरातील उपकरणे पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी कपिल कश्यप त्याचा मोबाईल चार्जिंगला लावत होता. अचानक पसरलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्याला विजेचा झटका बसला.

त्यावेळी त्याचा भाऊ धर्मेंद्र आणि वहिनी चांदनी यांनाही विजेचा धक्का बसला. त्यानंतर जखमींना तातडीने कसबा पोलीस स्टेशनच्या रुग्णालयात आणण्यात आले, तेथून दोन्ही तरुणांना शहााबादच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे दोन्ही तरुणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच महिलेला बरान येथे रेफर करण्यात आले आहे. या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अहवालानुसार, चांदनी कश्यप या महिलेच्या पतीचा नुकताच कोटा नाक्याजवळ झालेल्या एका रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. आता घरातील आणखी दोन भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

 

विशेष म्हणजे कसबा पोलीस ठाण्याचा परिसर हा बारां जिल्ह्यातील आदिवासी भाग असून, येथील वीजवाहिन्या पूर्णपणे सुस्थितीत नाहीत, त्यामुळे परिसरात जास्त विद्युत प्रवाह वाहत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. पावसाळ्यापूर्वी वीज दुरुस्तीच्या नावाखाली विभागाकडून कामे केली जात असली तरी देखभाल दुरुस्ती केली जात नाही, त्यामुळे अनेकवेळा असे अपघात घडतात. त्यामुळेच रविवारी याच आदिवासी भागात केलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील खुशियारा नारायण खेडा रोडजवळील हरिचरण मेहता यांचा यांचा बद्रीलाल यांचा 11 केव्हीचा बिघाड दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here