कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुतले; व्हिडीओ व्हायरल

0
21

महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सद्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुतले आहे. या घटनेनंतर कॉंग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका होत आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे नेता आणि कार्यकर्त्यांमधील अपार प्रेम असल्याचा बोलले जात आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील वडागाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले सहभागी झाले होते. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच दरम्यान त्यांनी स्थानिक शाळेजवळ संत श्री गजानन महाराजांच्या पालखी मिरवणुकीला भेट दिली. रिमझिम पाऊस असल्यामुळे परिसरात चिखल झाले हेते. चिखलातून जाऊन त्यांनी पालखीचे दर्शन घेतले.

त्यानंतर ते नागपूरला जाण्यासाठी आपल्या वाहनाकडे परले आहे. पाय चिखलाने माखले होते त्यामुळे पाय धुण्यासाठी त्यांनी पाणी मागवले होते. यानंतर विजय गुरव कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाना यांचे चिखलाने माखलेले पाय हाताने धुतले. इतर जमावांनी या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोध पक्ष नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप पक्षाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी नाना पटोले यांना खडे बोल सुनावले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची माफी मागावी अशी विनंती केली आहे.

पाहा व्हिडीओ:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here