आजचे राशी भविष्य 16th August: तुमचा जुना मित्र तुमच्याशी बऱ्याच काळानंतर भेटेल.. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा

0
11312

 

मेष:आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. विदेशातून व्यापार करणाऱ्या लोकांना मोठा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. तुम्ही एखादी संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकता आणि तुमची ही योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

वृषभ:आजचा दिवस तुमच्यासाठी सुख-सुविधा वाढवणारा असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. बऱ्याच कालावधीनंतर तुमच्या काही मित्रांची भेट होईल. तुम्हाला वरिष्ठांकडून काही सल्ला मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चालू असलेली खटपट दूर करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी शोधणार्यां ना आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. नातेवाईकांसोबतचं नातं अधिक घट्ट होईल.

मिथुन:आजचा दिवस विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढवणारा असेल. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतित व्हाल. तुमची कमाई वाढल्याने तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी केलेले वचनही तुम्ही वेळेत पूर्ण करू शकाल. बऱ्याच काळापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. तुम्हाला एखाद्या सहकाऱ्याशी तुमचे मन मोकळे करण्याची संधी मिळेल. आई तुमच्याशी एखाद्या गोष्टीबद्दल नाराज होईल. बायकोच्या मर्जीनुसार नाही वागला तर नुकसान होईल.

कर्क:आज घरातील कलहातून सुटका होईल. सरकारच्या काही योजनांमध्ये पैसा गुंतवायचा विचार करू शकता. घरात कोणाशी तरी वादावादी होऊ शकते.व्यवसायात काही बदल करावे लागतील. तुमच्या कामांमुळे जोडीदाराला कमी वेळ द्याल. त्यामुळे जोडीदाराची नाराजी ओढवेल. कुणाकडूनही आज पैसे उधार घेऊ नका. वाहन खरेदीचा योग आहे. जमिनीचा तुकडा विकण्याचा विचार कराल. प्रेयसीची नाराजी ओढवून घ्याल.

सिंह:आजचा दिवस तुमच्यासाठी वाणी आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा असेल. तुम्ही नोकरीच्या ठिकाणी दिलेले सल्ले लोक मान्य करतील, पण इतरांच्या बोलण्यावर जाऊ नका. तुमच्या योजनांवर लक्ष केंद्रित करा. जर तुमचा काही खटला चालू असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुमची कमाई वाढल्याने तुम्ही खूप आनंदी व्हाल. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील.

कन्या:आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीने भरलेला असेल. तुम्हाला जास्त काम करावे लागेल. जर तुम्ही कोणत्याही कामासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला सहज मिळेल. भाऊ-बहीण तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण साथ देतील, पण नोकरीत तुम्हाला तुमच्या बॉसकडून एखाद्या कामाच्या निमित्ताने ओरडा खावा लागू शकतो. जेवणावर नियंत्रण ठेवले नाही तर तुमचा जुना रोग पुन्हा उद्भवू शकतो. आर्थिक स्थितीबद्दलची चिंता दूर होईल.

तुळ:आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा उलटसुलट जाऊ शकतो. प्रेमात असणाऱ्यांना आपल्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना चिंता वाटू शकते. आज तुम्हाला धार्मिक गोष्टींत रस असेल आणि तुम्ही खूप धैर्यवान व्हाल. पण, तुमच्या एखाद्या सहकाऱ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. म्हणून, आज कोणतेही महत्त्वाचे काम इतरांच्या हाती देऊ नका.

वृश्चिक:आजचा दिवस तुमच्यासाठी चांगलाही असेल आणि वाईटही असेल. तुम्हाला कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागू शकतो. अनोळखी लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जर तुम्ही पूर्वी कर्ज काढले असेल तर आज ते मोठ्या प्रमाणात फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमच्या मनात नकारात्मक विचार आणू नका. तुमचे विचार तुम्हाला कामकाजाच्या क्षेत्रात मान-सन्मान मिळवून देतील.

धनु:आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल. व्यवसायात तुम्हाला आनंददायी बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्ही तुमच्या कामात धीर धरून पुढे जाणार असाल तर तुमच्यासाठी चांगले राहील. तुमचा जुना मित्र तुमच्याशी बऱ्याच काळानंतर भेटेल. तुमचा पैसा व्यवसायात बुडाला असेल तर तो तुम्हाला परत मिळू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर:आजचा दिवस तुमच्यासाठी चांगलाही आणि थोडा वेगळाही असणार आहे. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना पैसे गुंतवण्याची चांगली संधी मिळेल. तुम्ही समाजाच्या कामात सक्रियपणे भाग घ्याल. कुटुंबात कोणीतरी तुम्हाला आनंददायी बातमी देईल. सासूरवाडीतून तुम्हाला पैसा मिळेल. मुलाच्या काही कृत्यामुळे तुम्ही त्याच्यावर नाराज व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या महिला मित्रांची तुम्हाला चांगला साथ मिळेल.

कुंभ:आजचा दिवस तुमच्यासाठी अध्यात्माच्या कार्यात गुंतून नाव कमावण्यासाठी उत्तम आहे. दान-पुण्य करण्यात तुमची उत्सुकता वाढलेली असेल. व्यापारात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकू येऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या आणि कोणी काही सल्ला दिला तर त्यावर विचार करूनच निर्णय घ्या. तुमचे मन काही गोष्टींमुळे अस्वस्थ राहू शकते. मैत्रीणीसोबत डेटिंगला जाण्याचा योग आहे. घरात कुरबुरी होतील.

मीन:आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीदायी ठरेल. तुम्ही तुमची कमाई वाढवण्यावर भर द्याल, यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदलही करू शकता. नोकरीत कार्यरत लोकांनी काही वादळी लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही कोणाशीही व्यवहार करण्यापासून दूर राहा, नाहीतर त्यात तुमच्याशी फसवणूक होऊ शकते. आई-वडिलांची सेवा करण्यासाठी तुम्ही दिवसाचा काही वेळ काढाल. तुमचा जोडीदार तुमच्या कामात तुमचे पूर्ण साथ देईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here