पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येण्याची अपेक्षा; ‘असे’ तपासा लाभार्थीचे नाव

0
339

 

शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा होतात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याच्या स्वरूपात जमा केली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपयांचा लाभ मिळतो. जून महिन्यात सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 17 वा हप्ता जमा केला होता. अधिकृत आकडेवारीनुसार, 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. आता शेतकरी 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी येणार?
पीएम किसान योजनेंतर्गत दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होते. 17 व्या हप्त्याची रक्कम जून 2024 मध्ये आली. त्यामुळे आता पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येण्याची अपेक्षा आहे. जर तुम्हीही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो.
PM किसान योजना लाभार्थी यादीतील नाव कसे तपासावे –

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
आता ‘नो युवर स्टेटस’ हा पर्याय निवडा.
यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाका.
आता स्क्रीनवर दाखवलेला कॅप्चा कोड टाका आणि ‘Get Details’ वर क्लिक करा.
यानंतर तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

जर तुम्ही अद्याप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला नसेल, तर तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सहजपणे अर्ज करू शकता. तुम्ही खालील पद्धतीने PM किसान योजनेसाठी अर्ज करू शकता.
pmkisan.gov.in वर जा आणि Farmers Corner चा पर्याय निवडा.
आता New Farmer Registration वर क्लिक करा.

यानंतर ग्रामीण शेतकरी नोंदणी किंवा शहरी शेतकरी नोंदणी यापैकी एक पर्याय निवडा.
आता तुम्हाला आधार, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल आणि Get OTP वर क्लिक करा.
यानंतर, फोनमध्ये प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि नोंदणीसाठी पुढे जाण्याच्या पर्यायावर जा.
आता तुम्हाला जिल्हा, बँक आणि आधार कार्ड इत्यादी माहिती द्यावी लागेल.
ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला कागदपत्रेही अपलोड करावी लागतील.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह बटणावर क्लिक करावे लागेल.
सेव्ह बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर ॲप्लिकेशन पुष्टीकरण संदेश दिसेल.पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचे ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने आधीच स्पष्ट केले होते की, या योजनेत सामील झालेल्या सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्याने केवायसी केले नाही तर ते हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here