तीन युवतींचा बुडून मृत्यू, ; एकीला वाचवायला दुसरी गेली, दुसरीला वाचवायला तिसरी गेली ; तीन मैत्रणींच्या जाण्यावर गावावर शोककळा

0
4

माणदेश एक्सप्रेस न्युज/ नांदेड : नांदेड जिल्ह्यातून आणखी एका दुर्दैवी घटना समोर आली आहे. किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून 3 युवतींचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (12 वर्षे,) पायल देविदास कांबळे (16 वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (19 वर्ष) रा.मारेगाव (खालचे) ता.किनवट ह्या तीन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किवटजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एकीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली.

 

त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here