माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी : राज्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्याचा एकूण निकाल हा 95.81 टक्के लागला आहे. या निकालामद्ये पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग यामध्ये सगळ्यात मागे आहे.
या निकालाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या निकालात मुलीनी बाजी मारली आहे. आपला मुलगा पास झाल्याचा आनंद अनेक विद्यार्थ्यांनी साजरा केला. मात्र रायगडमधील उरण तालुक्यातील एका विद्यार्थ्याने फक्त 50 टक्के गुण मिळवून इतरांपेक्षा वेगळा आनंद साजरा केला आहे.
रायगडमधील उरण तालुक्यातील एका विद्यार्थ्याने फक्त 50 टक्के गुण मिळवून इतरांपेक्षा वेगळा आनंद साजरा केला असून पालकांनी मुलाची चक्क जेसीबीमधून मिरवणूक काढली. सार्थक नारंगीकर अस या विद्यार्थ्याचे नाव असून तो उरणच्या चिरनेर परीसरात राहतो. या मुलाला केवळ 50 टक्के गुण मिळाले आहेत. त्याची जेसीबी मधून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.