अनिलभाऊ… तुम्ही पाहिलेले स्वप्न आले पूर्णत्वास !

0
8

माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी : आटपाडी पोलीस ठाण्याला नवीन प्रशस्त, आधुनिक इमारत उभी करण्यासाठी दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांनी हयातीत मोठे प्रयत्न केले. जुनी, गळकी, प्लॅस्टिक आच्छादन करावे लागणाऱ्या पोलीस ठाण्यापासून अधिकारी, कर्मचारी आणि जनतेची सुटका अनिलभाऊ यांनी केली. तब्बल 4 कोटी 66 लक्ष रुपयातून आटपाडी पोलीस ठाणे ची नवी अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक सुसज्ज अशी इमारत पूर्ण झाली असून त्यामुळे आटपाडीच्या वैभवात भर पडली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या नवीन पोलीस स्टेशन इमारतीची आवश्यकता होती नूतन इमारतीतून जो कारभार चालतो तो चांगला चालला पाहिजे जसं पोलीस स्टेशनची इमारत सुंदर दिसते तसं पोलीस दलाचे काम सुंदर दिसले पाहिजे. अनिलभाऊ यांच्यामुळे पोलीस ठाण्याचा प्रश्न सुटला असून हे चित्र पाहण्यासाठी आज भाऊ आपल्यात नाहीत. परंतु त्यांचे काम चिरंतन लोकहिताची साक्ष देत होते, देत आहे आणि देत राहील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here