दिघंचीचे बळीराम रणदिवे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड

0
7

माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी : दिघंची ता. आटपाडी येथील बळीराम रणदिवे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदरची निवड सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष प्रा. सुनील मगरे प्रदेश यांनी केली असून त्यांना निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये व संमतीने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सहकार्य करावे. असे निवड पत्रात नमूद केले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रा. सुनील मगरे प्रदेश अध्यक्ष, सांगलीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, विनायक मासाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here