हवामान खात्याने दिले मान्सूनबाबत महत्त्वाचे अपडेट ; राज्यात पाच दिवस अवकाळी पाऊस तर “या” जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

0
19

माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी : रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकले असून या चक्रीवादळाचा वेग 130 किलोमीटर पेक्षा पुढे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसा मध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून आजूबाजूच्या 10 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एकंदरीत तापमान पाहिले तर राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढलेलाच आहे व दुसरीकडे मात्र अवकाळी पाऊस देखील हजेरी लावताना दिसून येत आहे. राज्यामध्ये उकाडा वाढत असून यामुळे मान्सून लवकर येईल असे संकेत मिळत असून वाढत्या उकाडाच्या पार्श्वभूमीवर मान्सून चांगली आगेकूच करत आहे.

 

साधारणपणे नऊ तारखेला अंदमान मध्ये मान्सून दाखल झालेला होता व 31 मे पर्यंत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, एवढेच नाही तर 10 जून दरम्यान मुंबई तसेच कोकणात मान्सून प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यापुढील पाच दिवस म्हणजेच 15 जून पर्यंत मान्सूनचे नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर व त्यासोबतच मराठवाडा व विदर्भात देखील आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

यासोबतच मुंबई व कोकण, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात अवकाळी सोबतच एक जून पर्यंत उष्णता सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40° च्या पुढे आहे. देशात व राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सध्या चित्र आहे व त्यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.

 

यासोबतच मान्सूनचे आगमन पाहिले तर 10 जूनच्या आसपास मुंबई व कोकणात मान्सून प्रवेश करेल व त्यासोबतच 15 जून दरम्यान कोकणातून घाटमाथा ओलांडून खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये व मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. साधारणपणे 20 जून पर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर मानसून पसरेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here