खासदारांच्या शेतातच चोरी ! विद्युत पंपाच्या केबला चोरट्यांनी लांबविल्या

0
4

माणदेश एक्सप्रेस न्युज/धाराशिव : धाराशीवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या शेतात चोरी झाल्याची घटना घडली. ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातील विद्युत पंपाची केबल चोरट्यांनी लंपास लांबविली असल्याने याप्रकरणाची मोठी चर्चा समाज माध्यमावर होत आहे.

धाराशिव जिल्ह्यात शेतीपंप तसेच केबल चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. त्यातच चोरट्यांनी आता थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातच डल्ला मारला आहे. चोरट्यांनी शेतातील विद्युतपंपाचे 1200 रुपयांचे केबल चोरुन नेले आहे. कोल्हेगाव शिवारातील शेतात ही चोरी केली आहे. याबाबत अशोक साठे यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदारांच्या शेतातच चोरट्यांनी डल्ला मारल्याने लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

दिवसेंदिस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये वाहन चोरी असेल, घरफोडीच्या घटना असतील याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं नागरिक चिंतेत आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासन देखील अशा घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी उपापयोजना करताना दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here