पायलटच्या हुशारीमुळे हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला, पहा केदारनाथ मधील हेलिकॉप्टरचा थरारक व्हिडीओ

0
1

केदारनाथ यात्रेदरम्यान पायलटसह सात जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर हिमालय मंदिराजवळील हेलिपॅडपासून काही मीटर अंतरावर उतरले. पायलटसह विमानातील सातही जण सुरक्षित असल्याची पुष्टी अधिकाऱ्याने केली.

हेलिकॉप्टर पायलटच्या हुशारीमुळे अनेक यात्रेकरूंचे प्राण वाचू शकले. क्रिस्टलच्या हेलिकॉप्टरचे रडर खराब झाल्याने प्रवाशांनी भरलेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगचा व्हिडिओही समोर आला आहे. हेलिकॉप्टरला हेलिपॅडपासून 100 मीटर अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

क्रिस्टलच्या हेलिकॉप्टरचे रडर खराब झाल्याची माहिती मिळाली आहे. पायलटने हुशारीने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केले. हेलिकॉप्टर सुखरूप उतरल्यानंतर यात्रेकरूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा नेहमीच जोखमीची राहिली आहे. केदारनाथमध्ये गेल्या 11 वर्षांत 10 अपघात झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, हेलिपॅडच्या 100 मीटर पुढे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

केदारनाथ मधील हेलिकॉप्टरचा थरारक व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here