आटपाडी : वडिलांना दवाखान्यात पैसे खर्च केलेले, ते पैसे दे नाहीतर तुला येथेच गाढून टाकीन म्हणत, कुरुंदवाडीत चुलता, चुलतीने केले पुतण्याला मारहाण

0
2

माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी/प्रतिनधी : वडिलांना दवाखान्यात पैसे खर्च केलेले, ते पैसे दे नाहीतर तुला येथेच गाढून टाकीन म्हणत, आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथे चुलता,चुलतीने पुतण्याला काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकीदेत असून झालेल्या मारहाणीत पुतण्याला गंभीर दुखापत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी प्रकाश रामचंद्र भानुसे (वय 36), रा. कुरुंदवाडी ता. आटपाडी दिनांक 22 /05/ 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याचे सुमारास शेतात झाडाखाली झोपले असताना त्यांचा चुलता लक्ष्मण आनंदा भानुसे व चुलती हिराबाई लक्ष्मण भानुसे यांनी, ‘हे रान आमचे आहे, तुझा या रानात काही एक संबंध नाही. आम्ही तुझे वडिलांना दवाखान्यात पैसे खर्च केले ते पैसे दे नाहीतर तुला येथेच गाढून टाकीन’ तसेच या ठिकाणी पुन्हा दिसला तर बघ तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.

तसेच त्यांच्याकडील कळकाच्या काठीने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी पळून जात असताना चुलतीने कॉलरला पकडून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. याबाबत प्रकाश भानुसे याच्या फिर्यादीवरून चुलता लक्ष्मण आनंदा भानुसे व चुलती हिराबाई लक्ष्मण भानुसे यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात भादविस 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here