प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, सहा जणांना जलसमाधी ; शोध मोहीम संपली

0
4

माणदेश एक्सप्रेस न्युज/ अकोले : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटल्याची (SDRF Boat Capsizes) घटना गुरुवारी घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. बोट उलटल्याने तीन एसडीआरएफ जवानांचा मृत्यू झाला होता. तर दोन जणांचा शोध सुरु होता. आता दोन जणांचा मृतदेह सापडले आहेत.

बुधवारी दुपारी अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोन तरुण बुडाले होते. सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला होता. मात्र अर्जुन जेडगुले याचा शोध बुधवारी उशिरापर्यंत आढळला नाही. त्यामुळे तरुणाचा शोध घेण्यासाठी गुरुवारी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या पथकातील पाच जण आणि स्थानिक असे एकूण सहा जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह बुधवारी सापडले होते. तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र अर्जुन जेडगुले आणि स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) यांचा शोध गुरुवारी दिवसभर सुरु होता.

आता अर्जुन जेडगुले आणि गणेश देशमुख (वाकचौरे) यांचे मृतदेह सापडले आहेत. ठाणे येथील टीडीआरएफच्या (Thane TDRF) पथकाने दोनही मृतदेह बाहेर काढले आहेत. पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर दोन्ही मृतदेह सापडले. एकाचा मृतदेह घटनास्थळापासून जवळच तर दुसरा मृतदेह एक किमी अंतरावर सापडला आहे. या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अकोले (Akole) तालुक्यातील शोध मोहीम संपली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here