
वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. वाघाने डरकाळी फोडताच सर्व जण गार पडतात. माणसंच नाही तर किती तरी प्राणीही वाघाला घाबरतात. एका फटक्यात तो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतो. अगदी वेळ आली तर तो सिंहाशी दोन हात करायलादेखील मागे पुढे पाहात नाही. पण, शिकारीत प्रत्येक वेळी वाघाला यश मिळेलच असं नाही. सध्या अशी शिकार करायला गेलेल्या वाघाची कशी फजिती झाली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सध्या सोशल मीडियावर वाघाच्या शिकारीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका माकडानं चक्क वाघाला आव्हान दिलं. मग काय वाघ थोडीच सोडणार, वाघ कोणत्याही परिस्थितीत माकडाची शिकार करण्याचा निर्णय घेतो. याच नादात तो झाडावरही चढतो, जिथे माकड फांदीवर बसून आराम करत असतं. वाघ माकडाचा पाठलाग करत थेट त्याच्यावर उडी घेण्याचा प्रयत्न करतो, पण धूर्त माकड झाडाची मजबूत खोडं सोडून एका पातळ फांदीला लटकतो. पण, वाघदेखील धाडसी शिकारी आहे. तोसुद्धा अगदी सहज गतीनं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाऊ लागतो आणि माकडही झाडावर उड्या मारून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. पण, वाघाला झाडावर उड्या मारण काही जमत नाही.
वाघ फांद्यांचा अंदाज घेत हळूहळू पुढे सरकत राहतो. पाहता पाहता वाघ माकडाच्या अगदी जवळ पोहोचतो. आता केवळ वाघाच्या एकाच उडीत माकडाची शिकार होणार असं दिसतं, मात्र, माकडानेही हार मानली नाही आणि वाघाला आपल्याकडे आकर्षित करून जोरात उडी मारत तो मागे पळून गेला. वाघाच्या अतिवजनामुळे झाडाच्या फांद्या वाकतात आणि वाघ थेट जमिनीवर पडतो. माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्याचा खेळ करत वाघाला खाली पडण्यास मजबूर करतो. अशा परिस्थितीतही हार न मानता आपल्या आयुष्यासाठी संघर्ष करत राहाणारे हे प्राणी अनेकदा माणसांनाही धडा देऊन जातात. वाघाला धडा शिकवण्यासाठी माकडानं लढवलेली शक्कल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही सर्व दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओला आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला माहीत नव्हते की वाघ झाडांवर चढू शकतात?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खाली पडल्यानंतर वाघाला वाटले असेल, अरे देवा, हे कोणीही पाहिले नसावे.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येकाचा स्वतःचा प्रदेश असतो, वाघाने त्याचा अभिमान सोडला पाहिजे.”