‘थलपथी’ विजयच्या वाढदिवसाच्या पार्टीत चाहत्याच्या हाताला लागली आग;पहा व्हिडीओ

0
6

चेन्नईच्या नीलंकराई भागात आयोजित अभिनेता विजयच्या वाढदिवसाच्या पार्टीत मुलांनी हातावर पेट्रोल टाकणे, फरशा तोडणे असे साहसी प्रयोग केले. या स्पर्धेत एका मुलाने हातात आग पेटवली आणि फरशा तोडायला सुरुवात केली. परंतु, या दरम्यान, त्याच्या हाताला आग लागली आणि नंतर ही आग संपूर्ण स्टेजवर पसरली.

‘थलपथी’ विजयच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडला अपघात; चाहत्याच्या हाताला लागली आग पॅन इंडियाचा स्टार थलपथी विजय याचा 50 वा वाढदिवस शनिवारी साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने चेन्नईतील अनेक भागात त्याच्या चाहत्यांनी वाढदिवस साजरा केला. दरम्यान, चेन्नईच्या नीलंकराई भागात आयोजित अभिनेता विजयच्या वाढदिवसाच्या पार्टीत मुलांनी हातावर पेट्रोल टाकणे, फरशा तोडणे असे साहसी प्रयोग केले. या स्पर्धेत एका मुलाने हातात आग पेटवली आणि फरशा तोडायला सुरुवात केली. परंतु, या दरम्यान, त्याच्या हाताला आग लागली आणि नंतर ही आग संपूर्ण स्टेजवर पसरली. मुलगा आरडाओरड करत पळू लागला. त्यानंतर स्टेजच्या खाली बसलेले चाहते मुलाच्या हाताची आग विझवण्यासाठी धावू लागले.

घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी आग विझवून मुलाला वाचवले आणि उपचारासाठी निलंगराय येथील खासगी रुग्णालयात नेले. सध्या या मुलाची प्रकृती चांगली आहे. रिपोर्ट्सनुसार, वॉटर कॅनमध्ये पेट्रोल खरेदी करणे देखील बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत विजयच्या चाहत्यांनी पाण्याच्या कॅनमधून पेट्रोल खरेदी करून या साहसात सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. असे साहस करण्यासाठी कोणतीही औपचारिक परवानगी घेण्यात आली नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
यापूर्वी, कल्लाकुरीची अवैध दारूच्या घटनेत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तमिलगा कळघमचे सरचिटणीस बस्सी आनंद यांच्या माध्यमातून अभिनेता विजयचे एक वक्तव्य समोर आले. चाहत्यांनी पीडितांना मदत करावी, वाढदिवस साजरा करू नये, असं बस्सी यांनी आवाहन केलं होतं.

विजयचा आगामी चित्रपट गोट आहे आणि त्याच्या वाढदिवशी अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपट गोटचा एक धमाकेदार टीझर रिलीज केला आहे. विजय चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत आहे. गोट या वर्षी 5 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

पहा व्हिडिओ –