धक्कादायक! कोल्हापुरात वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ

0
277

 

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील वृद्धाला उपचारासाठी (Treatment) टोपलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांना आली आहे. कोल्हापूरच्या (Kolhapur News) चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगर वाड्यावरील ही धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. धनगर वाड्यावर (Dhangar Wada) मतदार कमी असल्याने आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुजवडे (Bujwade) धनगर वाड्यावरील नवलू कस्तुरे (nawalu Kasture) यांना रविवारी रात्री अर्धांगवायूचा झटका (Paralysis Attack) आला. मात्र, धनगर वाड्यावरून रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना रात्रभर घरीच ठेवावं लागलं अखेर पहाटे जंगलातून पाच किलोमीटरची पायपीट करून ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल केलं.

 

वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ

वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याने नागरिकांना संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात अनेक धनगर वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. विशेषतः पावसाळ्यात या धनगर वाड्यावरील ग्रामस्थांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. धनगर वाड्यावर मतदार कमी असल्याने आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

 

नाशकात भर पावसात सरणावर ताडपत्री धरुन अंत्यसंस्कार

दरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील अजूनही मुलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे.  नाशिकच्या पेठ तालुक्यातील (Peth Taluka) कुंभाळे ग्रृप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डेरापाडा या तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या गावाला स्मशानभूमी निवारा शेड नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. डेरापाडा वासियांनी स्मशानभूमीला निवारा शेड नसल्याने भरपावसात सरणावर येणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी छत्र्यांचा व ताडपत्रीचा आसरा घेतला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाला मरण यातना भोगाव्या लागतं असल्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाली. डेरापाडा गावात स्मशानभूमीला अंत्यसंस्कार विधीसाठी निवारा शेड लवकरात लवकर बांधून मिळावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here