धक्कादायक! सांगली मध्ये पॅरोलवर असलेल्या गुन्हेगाराकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार

0
565

सांगली शहरातील संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार (Sexual Abuse) केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर होता. यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर या 35 वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत संशयित आरोपीस आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी संशयित आरोपी अवघ्या 2 तासात ताब्यात घेतलंय. संशयित आरोपी हा 2011 साली शहरातील प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 14 वर्षाची शिक्षा लागली आहे. तो सध्या पॅरोल रजेवर आला होता. त्यानंतर त्याने हे कृत्य केलं आहे. एकीकडे बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या (Minor Abuse Case) प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, आता राज्यातील इतर अनेक भागातून देखील सातत्याने अशाच घटना पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून आता विचारला जाऊ लागलाय.

पोलिसांनी अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या
हाती आलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात या प्रकरणातील आरोपीने पीडित मुलीस तू मला आवडतेस असे म्हणून तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. मात्र काल 23 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकीही दिली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीसात तक्रार दिली.

तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपीस आटपाडी येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणबाजी केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here