या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच प्रसिद्ध इंग्लिश अभिनेत्याशी लग्न, 5 वर्षांच्या मुलाची आई आहे अभिनेत्री

0
278

‘एक दिवाना था’, ‘2.0’, ‘क्रॅक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ॲमी जॅक्सन नुकतीच लग्नबंधनात अडकली. ‘गॉसिप गर्ल’ स्टार एड वेस्टविकशी तिने इटलीमध्ये लग्न केलंय. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ॲमी आणि एड यांनी 2022 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 25 ऑगस्ट रोजी त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

विशेष म्हणजे या लग्नाला तिचा पाच वर्षांचा मुलगादेखील उपस्थित होता. ॲमीने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. अँड्रियास असं तिच्या मुलाचं नाव असून तो ॲमी आणि तिचा पूर्व पार्टनर जॉर्ज पनायोटो यांचा मुलगा आहे. जॉर्जसोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

अँड्रियास दोन वर्षांचा असतानाच त्याची ओळख ॲमीने एडशी करून दिली होती. गेल्या दोन-तीन वर्षांत या दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्याचं ॲमीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. किंबहुना एडसोबत लग्न करण्यासाठी सर्वांत आधी अँड्रियासनेच हिरवा कंदिल दिला होता, असं ती म्हणाली.काही महिन्यांपूर्वीच एडने ॲमीला स्वित्झर्लंडमधील ब्रिजवर प्रपोज केलं होतं. या प्रपोजलचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.