गुन्हेताज्या बातम्या

जीवच देते अशी प्रियकराला धमकी देत रेल्वेरुळावर उतरली,आणि तितक्यातच ट्रेन आली ;पुढे काय झाले पहा

लिव्ह इन पार्टनरला घाबरवण्यासाठी एका महिलेनं आयुष्य संपवण्याची धमकी दिली. तिनं रेल्वे रुळांवर उडी घेतली. तितक्यात तिला समोरुन एक्स्प्रेस ट्रेन येताना दिसली.

उत्तर प्रदेशच्या आग्र्यात धक्कादायक घटना घडली आहे. राजा की मंडी रेल्वे स्थानकात ट्रेनच्या धडकेत ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. तिचा लिव्ह इन पार्टनरसोबत वाद झाला होता. त्याला घाबरवण्यासाठी तिनं रेल्वे रुळांवर उडी घेतली. मात्र लिव्ह इन पार्टनरला घाबरवण्याच्या प्रयत्नात तिचा जीव गेला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी आणि किशोर लोहामंडी परिसरात राहायचे. चाऊमीन विकण्याचं काम करणारा किशोर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. त्यावरुन राणी आणि किशोरचा वाद झाला. राणीनं किशोरला ट्रेनच्या समोर उडी घेऊन जीव देण्याची धमकी दिली. किशोरनं तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यानं तिला शांत करण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण राणी त्याला राजा की मंडी रेल्वे स्थानकात घेऊन गेली.

रेल्वे स्थानकातही दोघांचा वाद सुरु होता. फलाट क्रमांक दोनवर असलेल्या खुर्च्यांवर बसून दोघे भांडत होते. त्यावेळी किशोरला घाबरवण्यासाठी राणीनं रेल्वे रुळांवर उडी घेतली. तितक्यात तिला केरळ एक्स्प्रेस येताना दिसली. तिनं पुन्हा फलाटावर चढण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. तिनं पळण्याचा प्रयत्न केला. ट्रेननं तिला धडक दिली. ती ट्रेन आणि फलाटाच्या मधोमध अडकली. आरपीएफ चौकीचे प्रभारी लक्ष्मण पचौरींनी शिपायांच्या मदतीनं त्वरित कार्यवाही केली. राणीला ट्रेनच्या खालून बाहेर काढण्यात आलं. तिला एस एन वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.

उपचारांदरम्यान राणीनं अखेरचा श्वास घेतला. यानंतर पोलिसांनी किशोरची चौकशी केली. राणीच्या पहिल्या पतीचा मृत्यू अतिमद्यपानामुळे झाला होता, अशी माहिती किशोरनं दिली. राणी आणि किशोरचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. राणीच्या अपघाती मृत्यूची माहिती तिचे वडील विनोद यांना देण्यात आली. राणीला पहिल्या पतीपासून तीन मुलगे आहेत. तिची दोन मुलं तिच्या सोबत राहतात. तर मोठा मुलगा वेगळा राहतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button