“सांगून आलोया, थांबायचं नाय आता’ ,अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी नवे गाणे प्रदर्शित

0
319

समाज माध्यमांवर ‘दादाचा वादा’ हे गाण चांगलच व्हायरल होत आहे. अजित पवारांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर देखील हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. “सांगून आलोया, थांबायचं नाय आता, जिंकायचं हाय म्हणजे जिंकायचं हाय, गुलाल आपलाच उधळायचा तोवर, मागं पुढे आता बघायचं नाय… धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा, धराधराधरा आता ध्यास आता एक धरा… जोश धगधगता अंगात रगरगता, ऐकणार नाय कुणा आता… असे गाण्याचे बोल आहेत.

राज्यात दिवाळीपूर्वी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्ष लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गुंतले आहे. यात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र वाट निवडली आहे. जनसन्मान रॅलीतून सर्वसामान्यांपर्यंत अजित पवार पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. बारमतीमध्ये सध्या अजित पवार असून यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधला. पिकतं तिथं उगवत नाही. बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मिसरूड आमदार मिळाला पाहिजे. १९९१ ते २०२४च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. करोडो रुपयाच्या. आता बारामती शहर सोडून साडे सातशे कोटीच्या योजना सुरू आहेत. असे अजित पवारांनी यावेळी म्हटले.

पाहा व्हिडिओ –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here