नोकरीची मोठी संधी ! स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) विविध पदासांठी भरती सुरु, शिक्षण फक्त 10 वी पास

0
709

सरकारी नोकरीची (Government job) इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) जनरल ड्युटी कॉन्स्टेबलच्या 39000 हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2025 च्या अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवारांची परीक्षा 5 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2024 दरम्यान घेतली जाईल. ऑनलाइन शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे. यानंतर 5 ते 7 नोव्हेंबरपर्यंत दुरुस्तीसाठी वेल दिला आहे. या जागांसाठी संगणक आधारित ऑनलाइन चाचणी (CBT) जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये घेतली जाऊ शकते.

रिक्त जागांची सविस्तर माहिती
BSF: 15654 पदे
CISF: 7145 पदे
CRPF: 11541 पदे
SSB: 819 पदे
ITBP: 3017 पदे
AR: 1248 पदे
SSF: 35 पदे
NCB: 22 पदे

एकूण रिक्त पदांची संख्या – 3918 पदे
10 वी पास अर्ज करु शकतात

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. जर आपण वयोमर्यादेबद्दल बोललो, तर पात्र अर्जदारांचे वय 1 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित अधिक माहिती तुम्ही अधिसूचनेत पाहू शकता.

सरकारी नोकरी कशी मिळवायची?
जीडी कॉन्स्टेबल पदासाठी निवडीमध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असेल. संगणक आधारित परीक्षा (CBE) आयोगाकडून इंग्रजी, हिंदी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. CBE हा एक तासाचा असेल, ज्यामध्ये 80 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असेल.

पगार किती मिळणार?
एसएससी जीडी कॉन्स्टेबल पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-1 अंतर्गत 18,000 ते 56,900 रुपये पगार मिळेल. तर NCB मध्ये, वेतन स्तर-3 अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज करण्यासाठी किती शुल्क?
आरक्षणासाठी पात्र महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) मधील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. BHIM UPI, Net Banking, Visa, MasterCard, Maestro, RuPay क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरुन फी ऑनलाइन भरली जाऊ शकते. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here